जालना : भोकरदन तालुक्यातील वजीरखेडा येथे धार्मिक कार्यक्रमात मंडप उडून भाविकांच्या अंगावर कोसळल्याची घटना रविवार, 20 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. मंडप अंगावर कोसळून 20 ते 25 भाविक जखमी झाले असून जखमींवर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वजीरखेडा येथे महारूद्र यज्ञाच्या निमित्ताने शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास अचानक जोरदार वारा सुटला. जोरदार वाऱ्यामुळे मंडप उडून भाविकांच्या अंगावर पडला. यात 20 ते 25 जण जखमी झाले. या जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यापैकी 13 जणांचे सिटीस्कॅन करण्यात आल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली.