शेगाव : संतनगरी येथील सेठ ग. भ. मुरारका विद्यालय, शेगाव येथे 2007 पासून सेवेत स. शिक्षक पदावर कार्यरत असलेले समाजाभिमुख शिक्षक विष्णू सीताराम जाधव. आपलं दैनंदिन कर्तव्यनिष्ठा म्हणून शालेय अध्यापनाचे कार्य आवडीने तसेच अतिशय तळमळीने पार पाडतात. विद्यार्थ्यांना शिकवणीच्या पलीकडे जाऊन दरोरोज पूरक मार्गदर्शक करतात.

विद्यालयातील एन. सी. सी. प्रमुख शिक्षक या जबाबदारीने विद्यार्थ्यांना स्व: रक्षणाचे व देश संरक्षणाचे धडे देतात. विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन करतात. तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्याने विद्यार्थी सुद्धा दरोरोज नवनवीन ज्ञान व पूरक माहिती जाधव यांना विचारून आत्मसात करतात. शिक्षक जाधव यांना बालपणी पासूनच समाज कार्याची आवड असल्याने त्यांना त्यापासून दूर जाऊन करमत नाही. म्हणून दरवर्षी गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, गणवेश, शालेय उपयोगी असणारे इतर साहित्य दरवर्षी वाटप करतात. तसेच ज्या विद्यार्थ्यांना शालेय परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नाही, अशा विद्यार्थ्यांची फी भरण्याची व्यवस्था करतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता प्रामाणिकपणे समाजकार्य पार पडतात. समाजसेवेची आवड असल्याने नेहमी सामाजिक बांधिलकी जोपसण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक उपक्रम, कार्य प्रसंगी नेहमी पुढाकार घरून उत्साहाने सामाजिक कार्य पार पडताना दिसून येतात.
गोर-गरिबांच्या मुलांना शैक्षणिक मदत
आज गोर-गरिबांच्या मुलांना शैक्षणिक मदत करायला कोणी पुढे येताना दिसत नाही. परंतु एक समाज सेवेची आवड असलेले व आपल्या कर्तव्याशी निष्ठा असलेले व्यक्तिमत्व विष्णू जाधव यांच्या रूपाने समाजाला एक अभिप्रेत असलेला समाजाभिमुख शिक्षक लाभला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे एक आदर्श शिक्षक विष्णू जाधव यांचा शेगाव तालुक्यातील परिसरातून व शिक्षक वर्गाकडून कौतुकास पात्र ठरत आहे. ही शेगाव तालुका वासियांसाठी अभिमानाची बाब आहे.