कारंजा नगरपरिषद उपाध्यक्ष निवडणुकीत एमआयएमची बाजी : ॲड. फिरोज शेकुवाले विजयी; भाजपचा उमेदवार पराभूत

कारंजा (लाड) : नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत एमआयएमने बाजी मारली असून ॲड. फिरोज शेकुवाले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अजय श्रीवास यांचा पराभव झाला. 

ॲड. फिरोज शेकुवाले

कारंजा (लाड) : नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत एमआयएमने बाजी मारली असून ॲड. फिरोज शेकुवाले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अजय श्रीवास यांचा पराभव झाला. 

नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा सोमवार, १२ जानेवारी रोजी नगरपरिषद कार्यालयात पार पडली. उपाध्यक्ष पदासाठी एमआयएमकडून ॲड. फिरोज शेकुवाले तर भाजपकडून अजय श्रीवास यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्षांच्या मतासह झालेल्या मतदानात ॲड. फिरोज शेकुवाले यांना १७ मते, तर अजय श्रीवास यांना १३ मते मिळाली. राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे प्रमोद गायकवाड व घाटंजी विकास पॅनेलचे अमोल गढवाले यांनी तटस्थ भूमिका घेतली.  यानंतर पिठासीन अधिकाऱ्यांनी ॲड. फिरोज शेकुवाले यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी नगराध्यक्ष फरीदाबानू मोहम्मद शफी पुंजाणी यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले, तर मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केले. दरम्यान, स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपकडून अतुल चीमेगावे तर एमआयएमकडून मोहम्मद शोएब शेख मेहमूद व अब्दुल एजाज अब्दुल मन्नान यांची निवड करण्यात आली. कारंजा नगरपरिषदेतील सत्तासमीकरण अधिक स्पष्ट झाले असून, एमआयएमचे स्थान अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »