dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

माजी खासदार इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला: जिन्सी परिसरातील घटना, पोलिसांकडून सौम्य लाठीमार

छत्रपती संभाजीनगर :  एमआयएम पक्षाचे माजी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार, 7 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जिन्सी परिसरात घडला. या घटनेनंतर समोरा – समोर आलेल्या दोन गटांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील हे बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जिन्सी, शहागंज, किराडपुरा प्रभाग क्रमांक 13 आणि प्रभाग क्रमांक 14 येथे प्रचार रॅलीसाठी गेले होते. त्यावेळी एमआयएम पक्षातील काही नाराज कार्यकर्त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी काळे झेंडे दाखविणाऱ्यांना पिटाळून आवल्यानंतर त्‍यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या कारचा पाठलाग करुन त्यांना कारबाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका कार्यकर्त्याच्या डोळ्याला मार लागला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यावर सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून हा हल्ला राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, संजय शिरसाठ यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top