dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

कोणावर टिका नाही, अकोल्याला आधुनिक बनवायचे आहे :  देवेंद्र फडणवीस

अकोला : आता कोणावर टिका करायची नाही, सकारात्मक काम करुन दाखवायचे आहे. पुढच्या कामे विजन क्लिअर आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे. हातात निधी आहे. सर्व गोष्टी स्पष्ट असल्याने आता अकोल्याला राज्यातील आधुनिक शहर बनवायचे आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अकोल्यातली सभेत दिले. 

 महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रविवारी अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आ. अमोल मिटकरी, डॉ. दशरथ भांडे, आ. प्रकाश भारसाकडे, विजय देशमुख, विजय अग्रवाल, अर्चना म्हैसने, गिरीश जोशी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.   मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच शहरातील हद्दवाढ भागातील रखडलेल्या विकास कामांचा अनुशेष भरून काढणार असल्याचे सांगितले. शहराच्या विकासासाठी प्रामुख्याने भूयारी गटारी, घनकचरा व्यवस्थापन (कचरा प्रक्रिया करून खत निर्मीती, वीज निर्मीती), जल व्यवस्थापन, नदीमध्ये शुद्ध पाणी गेले पाहिजेत याकडे लक्ष केंद्रीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच हद्दवाढ भागातील १०० कोटींची कामे यापूर्वी पूर्ण झाली असून १४३ कोटींची कामे लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

देवाभाऊ अन् त्यांचे आश्वासनं…

२२१ कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना

अकोला शहराला २४ तास पाणी 

नाल्यातील पाणी शुद्धीकरणानंतरच नदीत सोडले जाईल 

६२९ कोटींचा मलनिस्सारणाचा दुसरा टप्पा लवकरच 

न्यू तापडीया नगरच्या ३७ कोटींचा निधी 

पुढच्या टप्प्यात एअर ट्रेनिंग सेंटर करणार आहोत 

महापालिकेची नवीन इमारत करणार

सर्वच डीपी रोड काँक्रिटचे करण्यासाठी निधी देऊ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top