dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शिवसेना  नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा;  जिल्ह्यातील सगळ्या दिग्गजांची उपस्थिती,  केंद्रीय मंत्री जाधव कुठे? 

बुलढाणा : बुलढाणा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आज , ५ जानेवारी रोजी पार पडत आहे.  नगरपरिषद परिसरात होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेते, उद्योजक सर्वच क्षेत्रातील मान्यवर  मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 

बुलढाणा : बुलढाणा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आज , ५ जानेवारी रोजी पार पडत आहे.  नगरपरिषद परिसरात होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेते, उद्योजक सर्वच क्षेत्रातील मान्यवर  मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. परंतु केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे कार्यक्रमात दिसत नसल्याने वेगळी राजकीय   शंका निर्माण होते की काय, अशी स्थिती आहे. या पदग्रहण सोहळ्याला आकर्षक रूप प्राप्त झाले असून,  प्रमुख उपस्थितीत बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, शेतकरी नेते रविकांत तुपकर, भाजप नेते  योगेंद्र गोडे, उद्योजक अमोल हिरोळे यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती आहे. नगराध्यक्ष शिवसेनेच्या असूनही, जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वोच्च नेते मानले जाणारे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची अनुपस्थिती नवीन चर्चेला तोंड फोडणारी आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top