dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात विद्यार्थीनी ठार; दोन जखमी

खामगाव :   ट्रॅक्टर  व  दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात १९ वर्षीय विद्यार्थीनी ठार झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी किन्ही महादेव जवळ घडली. मृतक विद्यार्थीनी ही उमरा अटाळी येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपघाताची माहिती गावात धडकताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

         उमरा अटाळी येथील गौरी सुरेश महानकर (१९) ही विद्यार्थीनी तिच्या मैत्रिणीच्या भावाच्या दुचाकीवर अंत्रज येथे पेपर देण्याकरीता जात होती. त्यावेळी किन्ही महादेव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये गौरी महानकर ही गंभीर जखमी झाली होती. तिला उपचाराकरीता येथील सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. तसेच गौरी हिची मैत्रिण गवई व तिचा भाऊ असे दोघे जण जखमी झाले आहेत. या दोघांनाही उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताबाबत माहिती उमरा अटाळी येथील गौरीच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेवून आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. सदर घटनेची माहिती हिवरखेड पोस्टेला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वृत्त लिहेपर्यंत या अपघाताबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता. परंतु या अपघातातील विद्यार्थीनीच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top