dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गजाआड; नायलॉन मांजासह 10 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर :  पर्यावरणास आणि मानवी जीवितास हानिकारक असलेल्या नायलॉन मांजाची कारमधून तस्करी करणाऱ्या दोन जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. 

छत्रपती संभाजीनगर :  पर्यावरणास आणि मानवी जीवितास हानिकारक असलेल्या नायलॉन मांजाची कारमधून तस्करी करणाऱ्या दोन जणांना गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. नायलॉन मांजाची तस्करी करणाऱ्याच्या ताब्यातून पोलिसांनी 3 लाख 45 हजार 600 रुपये किंमतीचे नायलॉन मांजाचे 288 गट्टू, 45 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, 7 लाख रुपये किंमतीची एक कार असा एकूण 10 लाख 90 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी मंगळवार, 23 डिसेंबर रोजी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिक दिलीप लोधे (22 वर्ष), रा.सोनार गल्ली, पद्मपुरा, बन्सीलालनगर परिसर, गणेश रामकिसन औताडे (25 वर्ष), रा. घेरडा, ता. गंगापूर अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची नावे आहेत. तर नासेर, रा. इंदौर, मध्यप्रदेश असे तिसऱ्या साथीदाराचे नाव आहे. गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक संदीप काळे, पोलिस अंमलदार कैलास काकड, विजय निकम, मनोज विखनकर, बाळू नागरे, विजय घुगे, प्रमोद सुरसे, सागर साळवे, अक्षय नाटकर आदींचे पथक सोमवार, 22 डिसेंबर रोजी रात्री देवगिरी महाविद्यालय ते रेल्वेस्टेशन रोडवर गस्तीवर होते. त्यावेळी कार क्रमांक (एमएच-12-जेयू-8799) ही भरधाव वेगाने संशयास्पदरित्या जातांना त्यांच्या निदर्शनास आली. गुन्हेशाखेच्या पथकाने कारचा पाठलाग करुन कार बन्सीलालनगर परिसरातील गांधीनगर येथे अडवली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, कारमध्ये असलेल्या सहा गोण्यांमध्ये असलेल्या बॉक्समध्ये 3 लाख 45 हजार 600 रुपये किंमतीचे नायलॉन मांजाचे 288 गट्टू मिळून आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top