मंगरुळपीर : मंगरुळपीर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निकालांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाले असले, तरी नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अशोक परळीकर यांनी ९,०४४ मते घेत ४,४९० मतांनी विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. दिलीप रत्नपारखी यांना ४,५५४ मते मिळाली.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी प्रभावी रणनीती राबवत नगरपालिकेवर आपला झेंडा रोवल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्याने आगामी काळात मंगरुळपीर नगरपरिषदेतील सत्तासमीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. चुरशीच्या राजकीय हालचालींनंतर अशोक परळीकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या विजयाने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून शहरात फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. या निकालांनंतर सत्तास्थापना, स्थायी समिती व विषय समित्यांची रचना, तसेच विरोधकांची भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्याने स्थानिक राजकारणात हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
नगरपरिषदेत पक्षनिहाय संख्याबळ
भाजप – १० नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ०५ नगरसेवक
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०१ नगरसेवक
एआयएमआयएम – ०१ नगरसेवक
शिवसेना – ०१ नगरसेवक
अपक्ष – ०३ नगरसेवक