The lotus has bloomed again in Ambad: भाजपा – रासप युतीला 16 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 4, अजित पवार राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा

The lotus has bloomed again in Ambad

The lotus has bloomed again in Ambad: यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत ‘एआय’ चा वापर करून भाजपाचे आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने प्रभावीपणे प्रचार करण्यात आला. मात्र, तरीही अंबड शहरातील मतदारांनी भाजपाच्या उमेदवारांनाच प्रतिसाद देत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देवयानी केदार कुलकर्णी यांना भरभरून मते देऊन विजयी केले.

The lotus has bloomed again in Ambad

रामदास पटेकर/ अंबड : यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत ‘एआय’ चा वापर करून भाजपाचे आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने प्रभावीपणे प्रचार करण्यात आला. मात्र, तरीही अंबड शहरातील मतदारांनी भाजपाच्या उमेदवारांनाच प्रतिसाद देत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देवयानी केदार कुलकर्णी यांना भरभरून मते देऊन विजयी केले. या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचे कमळ फुलले. भाजपला सर्वाधिक १४ जागांवर विजय मिळाला. तर भाजपसोबत युती असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षालाही २ जागा मिळविल्या. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश टोपे यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही त्यांच्या पक्षाला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला फक्त १ जागेवर विजय मिळवता आला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देखील एकच जागा मिळाली आहे.

अंबड पालिकेची निवडणूक सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. माजी मंत्री राजेश टोपे यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. अंबड शहरात १५ दिवस तळ ठोकून होते. मात्र, सत्ताधारी भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचा प्रभाव कमी करण्यात त्यांना अपयश आले. या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात आलेल्या देवयानी कुलकर्णी यांनी तब्बल १३ हजार ४२३ मते घेऊन प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या श्रद्धा शिवप्रसाद चांगले यांना पराभूत केले आहे. अंबड शहराला जायकवाडीच्या नाथ सागरातून पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरात स्वतंत्र पार्किंगसह इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे आश्वासम देण्यात आल्याने शहरतील जनतेने त्यांचा भरघोस मतानी विजयी केले आहे.

असे आहेत विजयी उमेदवार

प्रभाग 1 ज्योती बाबर (भाजप) गंगाधर वराडे (भाजप), प्रभाग 2 सविता कुलकर्णी (भाजप), उज्वल कुचे (भाजप), प्रभाग 3 विश्वजित खरात (भाजप), ताराबाई शहाणे (भाजप), प्रभाग 4 अर्जुन भोजने (राष्ट्रवादी श.प), आस्मा परवीन पठाण(राष्ट्रवादी श.प), प्रभाग 5 मंगलबाई खरात (भाजप), बंडू जाधव (भाजप), प्रभाग 6 रासपचे सचिन खरात व शेख बदुनिस्साबेगम, प्रभाग 7 नुरजहाँ हाश्मी (काँग्रेस), शेख फेरोज (भाजप), प्रभाग 8 पद्माबाई वराडे (भाजप), केदार कुलकर्णी (भाजप), प्रभाग 9 ललिता बुर्ले(राष्ट्रवादी श.प), संदिप खरात(राष्ट्रवादी श.प), प्रभाग 10 रंजना खरात (भाजप), राम लांडे(राष्ट्रवादी अ.प.) तर प्रभाग 11 मधून सावित्री गुढे (भाजप), विठ्ठल राणा (भाजप) हे उमेदवार विजयी झाले आहे.

 मित्रपक्ष आणि विरोधकांचा पराभव

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि काँग्रेस पक्षाला केवळ एक-एक जागेवर समाधान मानावे लागले. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागेवर विजय मिळवला आहे. भाजपने रासप वगळता सत्तेतील मित्रपक्षासोबत युती न करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »