Washim Municipal Council: वाशिम नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या मतमोजणीअंती विविध प्रभागांतील सदस्यपदाचे निकाल जाहीर होत असून, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रभाग 1 आणि 2 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. येथे तीन उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत.

वाशिम : वाशिम नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या मतमोजणीअंती विविध प्रभागांतील सदस्यपदाचे निकाल जाहीर होत असून, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रभाग 1 आणि 2 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. येथे तीन उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत. तर एक उमेदवार शिवसेना उबाठा गटाचा विजयी झाला आहे.निकाल जाहीर होताच कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभाग क्रमांक १ मधून अनिल ताजने हे भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, त्यांच्यासोबत अरुणा वाटाणे यांनीही भाजपकडून विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक २ मधून अ मध्ये शिवसेना उबाठा करुणा कल्ले ह्या विजयी ठरल्या आहेत. तसेच कासाबाई लोणसूने यांनी भाजपकडून वाशिम नगरपरिषद सदस्यपदाची निवडणूक जिंकली आहे.
विजयी उमेदवारांचे समर्थकांनी फटाके फोडून व घोषणा देत जल्लोष केला. दरम्यान, उर्वरित निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
