वाशिम : वाशिम नगरपरिषद निवडणूक २०२५ अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी सुरू असलेल्या मतमोजणीतील पहिल्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल केंदळे यांनी आघाडी घेतली आहे.

वाशिम : वाशिम नगरपरिषद निवडणूक २०२५ अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी सुरू असलेल्या मतमोजणीतील पहिल्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल केंदळे यांनी आघाडी घेतली आहे.
पहिल्या फेरीत अनिल केंदळे यांना १,५०३ मते मिळाली, तर उद्धव सेनेच्या उमेदवार रेखा सुरेश मापारी यांना १,४११ मते पडली.
दुसऱ्या फेरीतही भाजपचे उमेदवार आघाडीवर राहिले. या फेरीत अनिल केंदळे यांना १,४७५ मते, तर रेखा मापारी यांना १,३४० मते मिळाली.
दोन्ही फेऱ्यांअखेर अनिल केंदळे यांना एकूण २२७ मतांची आघाडी मिळाल्याने मतमोजणी केंद्र परिसरात त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उर्वरित फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, पुढील निकालासाठी उत्सुकता वाढली आहे.