छत्रपती संभाजीनगर : मद्यपान करून दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या विरुद्ध शहर वाहतूक शाखा पोलिसांनी शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री धडक कारवाईची मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 32 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी शनिवार, 20 डिसेंबर रोजी दिली.

मद्यपी करून दुचाकी आणि चार चाकी वाहन चालविणाऱ्या वाहनधारकाविरुद्ध शुक्रवारी रात्री शहर वाहतूक शाखा पोलिसांनी शहरातील विविध चौकात नाकाबंदी करून कारवाईची मोहीम राबवली. शहर वाहतूक शाखा पोलिसांनी बाबा पेट्रोल पंप चौक, सिडको बस स्थानक चौक, पंढरपूर चौक चौक, केंब्रिज स्कूल चौक, हर्सूल टी पॉइंट चौक आदी चौकात नाकाबंदी करून दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या वाहनधारकाविरुद्ध कारवाई केली. दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या वाहनधारकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली.