पहिल्या दोन तासांत वाशिममध्ये केवळ ६.५३ टक्के मतदान

वाशिम :  नगरपरिषद निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दोन तासांत मतदारांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे दिसून आला नाही. सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत शहरात केवळ ६.५३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

सकाळच्या वेळेत थंडी, मतदारांमध्ये दिसणारी उदासीनता तसेच काही केंद्रांवर मतदारांची संथ उपस्थिती यामुळे मतदानाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. मात्र, दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा निवडणूक प्रशासन व्यक्त करत आहे.

दरम्यान, सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »