dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर तहसील प्रशासनाची कारवाई :सिलेंडर जप्त ; परवाना रद्द करण्याचा इशारा

मंठा : शहरातील विविध हॉटेल्स आणि खानावळींमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यावसायिक वापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत, गुरुवार, 18 डिसेंबर रोजी तहसील प्रशासनाच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल चालकांकडून मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून यापुढे घरगुती सिलेंडर आढळून आल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

घरगुती वापरासाठी असलेल्या (लाल रंगाच्या) गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, मंठा शहरात अनेक हॉटेल व्यावसायिक अधिक नफ्याच्या उद्देशाने व्यावसायिक सिलेंडरऐवजी घरगुती सिलेंडरचा वापर करत असल्याची माहिती तहसील प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा नायब तहसीलदार विकास राजपूत, नितीन चिंचोले, ग्राम महसूल अधिकारी पांडुरंग सुलताने, लिपिक जितेंद्र लहाने, महसूल सेवक या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरातील हॉटेल्सची अचानक तपासणी केली. या धाड सत्रामध्ये अनेक नामांकित हॉटेल्समध्ये घरगुती सिलेंडर चालू स्थितीत आढळले. पथकाने तत्काळ हे सिलेंडर जप्त केले असून संबंधित हॉटेल मालकांवर ‘जीवनावश्यक वस्तू कायद्या’नुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. जप्त केलेला साठा पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. केवळ अधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडरचाच वापर करावा आणि शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन व्यावसायिकांना तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top