लासूर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरड धान्य खरेदी सुरु करण्यात यावी, मका, सोयाबीन, कापूस हमीभावाने खरेदी करण्यात यावे आदी मागण्यासाठी पाचपीरवाडी येथील शेतकऱ्यांनी गुरुवार, 18 डिसेंबर रोजी धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कसाबखेडा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणबाजी करीत परिसर दणाणून सोडला होता.

लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरड धान्य खरेदी सुरु करण्यात यावी, मका, सोयाबीन, कापूस हमीभावाने खरेदी करण्यात यावे आदी मागण्यासाठी पाचपीरवाडी, दिवशी, वरझडी, पिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी भाजपचे पदाधिकारी अंबरसिंग जंघाळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी हे आंदोलन केले. या आंदोलनात सुनिल जोनवाल, सोमिनाथ सोमासे, त्रिंबक बमनावत, आविष्कार सेवाभावी पोलिस संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष बापू सोमासे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक गणेश काळे, सीआयडीचे संदीप कोल्हे, बीट अंमलदार विनोद बिघोत आदींनी बंदोबस्त ठेवला होता. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.