dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पीएम आवास योजना, सिंचन विहिरीच्या अनुदानासाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन; लाभार्थ्यांना लवकरच मिळणार थकीत अनुदान

परभणी :  महात्मा गांधी रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीच्या कुशल बिलाचे अनुदान आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान लाभार्थ्यांना त्वरित मिळावे यासाठी काँग्रेसच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात बुधवार, 17 डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

परभणी :  महात्मा गांधी रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीच्या कुशल बिलाचे अनुदान आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान लाभार्थ्यांना त्वरित मिळावे यासाठी काँग्रेसच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात बुधवार, 17 डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना थकीत अनुदान लवकरच वितरीत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.

पीएम आवास योजना आणि सिंचन विहिरीचे अनुदान लाभार्थ्यांना न मिळाल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने ९ डिसेंबर रोजी आंदोलनाचा इशारा पंचायत समितीला देण्यात आला होता. पंचायत समिती प्रशासनाला इशारा देवूनही रखडलेले अनुदान पंचायत समिती कार्यालयाने वितरित न केल्याने बुधवारी काँग्रेसच्या वतीने परभणी तालुकाध्यक्ष बाळासाहेब रेंगे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा)अंतर्गत सिंचन विहिरींची कुशल बिल परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचे वर्ष २०२१, २०२२, २०२३, आणि २०२४ या चार वर्षातील लाभार्थ्यांना अद्याप बील अनुदान मिळाले नाही. याबाबत पक्षाच्या वतीने वारंवार सूचना देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला. इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनुदान वाटप झाले मात्र केवळ परभणी तालुक्यातीलच अनुदान रखडल्याने शेतकरी आक्रमक झाले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानाचा दुसरा टप्पा अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. घरकुलाचे कामे पूर्ण होऊनही मोठा कालावधी उलटला तरी अनुदान जमा न झाल्याने पंचायत समिती कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top