dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सरकी लाईन भागातील पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय 

खामगाव : येथील सरकी लाईन भागातील अर्जुन जल मंदिर जवळील पाईपलाईन अचानक फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याची घटना 16 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान उघडकीस आली.

खामगाव : येथील सरकी लाईन भागातील अर्जुन जल मंदिर जवळील पाईपलाईन अचानक फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याची घटना 16 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान उघडकीस आली.

         शहरात एकीकडे रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. तर काही भागांमध्ये पाईपलाईन मध्ये लिकेजेस आढळून आल्याने सुद्धा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. खामगाव शहरात दहा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून नागरिक  ऐन हिवाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी भटकंती करताना दिसून येत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. नगरपरिषदेकडून वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची पाण्याकरिता ओरड होताना सुद्धा दिसत आहे. त्यातच 16 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान शहरातील सरकी लाईन भागातील अर्जुन मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला लावलेल्या पेवर ब्लॉक खालून अचानक पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाल्याचे दिसून आले. सरकी लाईन ते केडिया टर्निंग पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लाखो लिटर पाणी वाहून जाताना दिसून आले. पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच नगर परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नगरपरिषद पाणीपुरवठा अधिकाऱ्याकडून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा पुन्हा एकदा काही काळासाठी विस्कळीत राहणार असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top