बुलढाणा : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील महत्त्वाचा भाग असलेल्या बारव पुर्नशोध व संवर्धनाच्या उद्दिष्टाने महाराष्ट्र बारव मोहीम राज्यभर मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. राज्यातील सर्व बारवांची शास्त्रीय नोंद, संवर्धन, जनजागृती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन या चार स्तंभांवर ही मोहीम पुढे जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१व्या जयंतीनिमित्त १५ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभरातील ३०१ बारवांवर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

बुलढाणा : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील महत्त्वाचा भाग असलेल्या बारव पुर्नशोध व संवर्धनाच्या उद्दिष्टाने महाराष्ट्र बारव मोहीम राज्यभर मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. राज्यातील सर्व बारवांची शास्त्रीय नोंद, संवर्धन, जनजागृती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन या चार स्तंभांवर ही मोहीम पुढे जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१व्या जयंतीनिमित्त १५ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभरातील ३०१ बारवांवर दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पाण्याच्या परंपरेचा गौरव अधोरेखित करणारा हा ऐतिहासिक उपक्रम असेल. या साठी स्थानिकांनी एकत्रीत येऊन आपल्या परिसरात असलेल्या बारवांची स्वच्छता मोहीम राबवत जागृती करण्याचे आवाहन या मोहीमेत करण्यात आले आहे.
राज्यभर मोहिमेचा मजबूत विस्तार करण्यासाठी विभागनिहाय, जिल्हानिहाय, तालुकानिहाय समन्वयक आणि गावागावांत स्थानिक टीम्सची उभारणी करण्यात येत आहे. राज्यातील बारवांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्दिष्टाने २००० पेक्षा अधिक बारवांचे गुगल मॅपिंग पूर्ण केले असून नवे शोध सुरू आहेत. हा महाराष्ट्रातील पहिलाच इतका मोठा डिजिटल नकाशा तयार होत आहे. लोकजागृतीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात बारव फोटो प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक गावाचे बारव शोध व नकाशांकन करण्याचे मोठे उद्दिष्ट मोहिमेद्वारे हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकही बारव दुर्लक्षित राहू नये हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे. या मोहिमेत विविध संस्था , महाविद्यालये , शाळा तथा सेवाभावी संस्थांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र बारव मोहिमेचे बुलढाणा जिल्हा समन्वयक संजय खांडवे ,प्रा किशोर वानखेडे, मार्गदर्शक विवेक चांदुरकर व प्रमोद टाले यांनी केले आहे .
३०१ बारवांचे होणार दस्तऐवजीकरण
मराठवाडा : ७०
पश्चिम महाराष्ट्र : ६३
दक्षिण महाराष्ट्र : ५२
पश्चिम विदर्भ : ३९
उत्तर महाराष्ट्र : ३५
पूर्व विदर्भ : २१
दक्षिण कोकण : २०
अदिती अर्बन परिवार बारव मोहिमेत सहभाग नोंदविणार
अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाभूमिचे मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी या लोकचळवळीत सहभागी होणार असून दोन वर्षापूर्वी मर्दडी बारवाचे स्वच्छता व दिपोत्सव शिवजागरमंच्या सोबत एकत्र येऊन साजरा केला होता याची माहिती दिली .या मोहिमेसाठी आम्ही सोबत राहून काम करु, १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीस बुलढाणा जिल्हयातील एका बारवेवर दिपोत्सव महाराष्ट्र बारव मोहिमेच्या नियोजनानुसार साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र बारव मोहिमेतील बारवांची चित्रप्रदर्शनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करणार असल्याचेही सुरेश देवकर म्हणाले.
