dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बहुचर्चित सारंगवाडी प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करणार एसआयटी : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले आदेश

चिखली :    बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जलसंधारण प्रकल्पांपैकी एक मानला जाणारा सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्प प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि संगनमताचा अड्डा बनल्याचा धक्कादायक प्रकार  जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणला होता. १६.६१ कोटीची मूळ निविदा २८०.६४ कोटी वर नेत यात १७०० टक्यांची  वाढ झाली. प्रकल्पावर आतापर्यंत २३९ कोटी खर्च केले… पण प्रत्यक्षात काम कुठे ?  असा सवाल माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी उपस्थित करुन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून सारंगवाडी प्रकल्पातील अनियमिततेची आता एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे.  

 बुलढाणा जिल्ह्यातील सारंगवाडी जलसंधारण प्रकल्पाच्या खर्चवाढीबाबत आणि संभाव्य अनियमिततेबाबत विशेष तपास पथक नेमून तीन महिन्यांत चौकशी केली जाईल तसेच दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी प्रकल्पाच्या किंमतीचा ‘अत्यंत संशयास्पद’ वाढता आलेख पत्रकार परिषदेत सादर केला होता. तसेच त्यांनी कामाची गुणवत्ता, गती आणि प्रत्यक्ष कार्यवाही मात्र शून्यावरच आहे. इतकी प्रचंड वाढ करूनही काम कुठे आहे? असा सवाल उपस्थित केला होता. किन्ही नाईक गावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर ननकर यांनी ठेकेदार कंपनीकडून धमक्या येत असल्याचे पत्रकारपरिषदेत सांगून चौकशीची मागणी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top