dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

कृत्रिम रेतनामुळे ‘सेक्स्ड सीमेन’ जातीवंत वासरांची निर्मिती : मराठवाडा – विदर्भ डेअरी प्रकल्पाने केली क्रांती 

पिंपळगाव रेणुकाई :  जातिवंत जनावरे उपलब्ध नसल्याने दुग्धोत्पादन वाढवण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत विदर्भ – मराठवाडा डेअरी प्रकल्पाने भोकरदन तालुक्यात ‘शेतकऱ्यांच्या दारात कृत्रिम रेतन सेवा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरित्या राबवला आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आता बाहेरून महागडी जनावरे आणावी लागणार नाहीत. तर त्यांच्याच जनावरांपासून १० ते २० लिटरहून अधिक दूध देणाऱ्या जातिवंत गायी व वासरे तयार करणे शक्य झाले आहे.

गणेश खिस्ते / पिंपळगाव रेणुकाई :  जातिवंत जनावरे उपलब्ध नसल्याने दुग्धोत्पादन वाढवण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत विदर्भ – मराठवाडा डेअरी प्रकल्पाने भोकरदन तालुक्यात ‘शेतकऱ्यांच्या दारात कृत्रिम रेतन सेवा’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरित्या राबवला आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आता बाहेरून महागडी जनावरे आणावी लागणार नाहीत. तर त्यांच्याच जनावरांपासून १० ते २० लिटरहून अधिक दूध देणाऱ्या जातिवंत गायी व वासरे तयार करणे शक्य झाले आहे.

      या प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धोत्पादन वाढीला गती मिळाली आहे. जो परिणाम पश्चिम महाराष्ट्रात कृत्रिम रेतन आणि एआयमुळे आधीच दिसून आला आहे.

दूध उत्पादकांना मोठ्या दराने बाहेरच्या राज्यातून जनावरे आणावी लागतात. पण ही जनावरे अनेकदा स्थानिक हवामानाशी जुळवून घेत नाहीत किंवा त्यांच्यात दोष असल्यामुळे दुधाचे उत्पन्न वाढत नाही. या सर्व समस्यांवर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे ‘सेक्स्ड सीमेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याच जनावरांमधून उच्च गुणवत्तेची, जास्त दूध देणारी मादी वासरे निर्माण करणे. हा प्रकल्प दोन विभागांमध्ये कार्यान्वित असून शेतकऱ्यांच्या दारात सेवा देत आहे. त्यामुळे प्रकल्पांतर्गत यशस्वीरित्या ‘सेक्स्ड सीमेन’ वासरांचे उत्पादन घेणाऱ्या अधिकारी आणि शेतकऱ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पिंपळगाव रेणुकाई येथे पार पडला. 

 येथील ज्या शेतकऱ्यांच्या गायींनी ‘सेक्स्ड सीमेन’ जातीची वासरे योग्यरित्या दिली; त्यात दत्तू गाडेकर, गणेश सोनवणे, अनिल सोनवणे, धनराज धनावत, ज्ञानेश्वर वाघ, शिवा बोर्डे, सोनू काकरवाल या शेतकऱ्यांचा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत चौधरी, पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ. उत्कर्ष वानखेडे आणि मराठवाडा डिव्हिजनचे प्रकल्प अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोनटक्के यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. 

     यावेळी प्रकल्प कार्यान्वित करणारे डॉ. राजरत्न वाघमारे, डॉ. एस एस जोशी, निलेश कुठे, अनंता वाघ, डॉ. मुकेश सारे, डॉ. राजू फुके, एकनाथ व्हानाळे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ अण्णा सोनुने, डॉ दत्तू साहाने, डॉ देवानंद बोर्डे, डॉ. कैलास मोरे, डॉ. ईफान पठाण, डॉ बबन कड, डॉ. राजू गायकवाड, डॉ.पंकज इंगळे, आजिनाथ सोनुने,

 सरपंच गणेश फुसे, पवन देशमुख, प्रफुल्ल लोखडे, संतोष बावस्कर आदींची उपस्थिती होती. 

महिलांचा सन्मान

भोकरदन तालुक्यात दुग्धोत्पादनात भरीव वाढ केलेल्या महिलांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये वर्षा चांदा, चंद्रकला बारोटे, मनीषा मिसाळ यांचा समावेश आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top