छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणास आणि मानवी जीवितास हानिकारक असलेल्या नायलॉन मांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या तीन जणांवर गुन्हेशाखा पोलिसांनी सोमवार, 8 डिसेंबर रोजी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या ताब्यातून 36 हजार 100 रुपये किंमतीचे 55 कट्टू जप्त केले असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिजवाना बेगम निसार शेख (45 वर्ष), शेख फिरोज हबीब शेख (42 वर्ष), दोघे रा. संजयनगर यांच्या ताब्यातून पोलिसांनी 33 हजार 600 रुपये किंमतीचे 51 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले. तर इस्माईल शेख उर्फ आदिल हाजी शेख (32 वर्ष), रा. सातारा गाव याच्या ताब्यातून 2 हजार 500 रुपये किंमतीचे 4 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले. ही कारवाई गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलिस आयुक्त वसुंधरा बोरगावकर, गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, पोलिस अंमलदार सुनील जाधव, शोन पवार, सुनिल पाटील, दिपक शिंदे, वाडीलाल जाधव, महिला पोलिस अंमलदार प्रिती इलग आदींच्या पथकाने ही कारवाई केली. नायलॉन मांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्याविरुध्द संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.