छत्रपती संभाजीनगर : मराठवाडयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्वूर्ण कामगिरी करून शिक्षणाची बिजे रोवली. शैक्षणिक क्षेत्रात मागासलेल्या मराठवाड्यात वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था सुरू करुन येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन डॉ. सुधाकर नवसागर यांनी शनिवार, 6 डिसेंबर रोजी केले.

अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरु महाविद्यालयातील लोकप्रशासन व राज्यशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाडा विभागासाठी दिलेले योगदान या विषयावर डॉ. सुधाकर नवसागर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मून, प्रा. डॉ. दिगंबर गंगावणे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पंडित नलावडे, डॉ. राजू वनारसे, डॉ. स्वाती नरोडे आदींची उपस्थिती होती. डॉ. सुधाकर नवसागर पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात 24 डिसेंबर 1934 सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यात आले. त्या काळात निजामाचे येथे सरकार अस्तित्वात होते. तसेच मराठवाडा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था सुरु करुन शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करुन शिक्षणाची बिजे रोवली.
दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मून, डॉ. सुधाकर नवसागर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दिगंबर गंगावणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजु वनारसे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. स्वाती नरोडे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.