बुलढाणा : बुलढाणा शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. थेट पोलीस वसाहतीमध्ये चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून यामध्ये, तब्बल २० लाखांचा मुद्देमाल चोरी गेला असून, पोलीस कर्मचारी ड्युटीवर तसेच बाहेर गावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डल्ला मारला.

बुलढाणा : बुलढाणा शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. थेट पोलीस वसाहतीमध्ये चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून यामध्ये, तब्बल २० लाखांचा मुद्देमाल चोरी गेला असून, पोलीस कर्मचारी ड्युटीवर तसेच बाहेर गावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डल्ला मारला. एक प्रकारे, या घरफोडीतून अज्ञात चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे. या संदर्भात, शहर ठाणेदार रवि राठोड यांच्याशी प्रत्यक्षपणे संवाद साधता आला नसला तरी, पोलिसांनी तपास चक्री वेगाने फिरवल्याचे त्यांनी फोनद्वारे दैनिक महाभूमिला सांगितले.
