छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनानिमित्ताने शनिवार, 6 डिसेंबर रोजी कॅन्डल धम्मरॅली, महापरित्राणपाठ, धम्मदेसना आणि महासंघदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भिक्खू ग्यानरक्षित थेरो यांनी शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी दिली. याप्रसंगी 1 हजार दीप प्रज्वलित करुन महामानवास श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनानिमित्ताने शनिवारी दुपारी दोन वाजेपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा रोपीत मिलिंद महाविद्यालय नागसेन वनातील बोधिवृक्षाची पुजा करून कँडल धम्म रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी रात्री ८ ते रविवार, ७ डिसेंबर रोजी पहाटे ७ वाजेपर्यंत महापरित्राणपाठ, धम्मदेसना आणि महासंघदान हे कार्यक्रम पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील संघगिरी महाविहार, मयुर मृगदायवन, भिक्खू ट्रेनिंग ॲण्ड रिसर्च सेंटर येथे होणार आहेत. याप्रसंगी भिक्खू शीलानंद महाथेरो, भिक्खू खेमधम्मो महाथेरो, भिक्खू ज्ञानज्योतीजी महाथेरो, ताडोबा, भिक्खू सिरी शिवली थेरो, नागपूर यांच्यासह श्रीलंका येथील शांतचित्त थेरो, एस.थेरो, उदीरज्ञान थेरो आणि भिक्खू संघाची उपस्थिती राहणार असल्याचे भिक्खू ग्यानरक्षित थेरो यांनी सांगितले.