छत्रपती संभाजीनगर : जैन टॅग ग्रुपच्या अध्यक्षा श्वेता राजेश कासलीवाल यांनी नुकतीच छत्रपती संभाजीनगर ते कुंथलगिरी अशी 185 किलोमीटर लांबीची सायकल यात्रा पूर्ण केली. श्वेता कासलीवाल वयाच्या 41 व्या वर्षी छत्रपती संभाजीनगर ते दिगंबर जैन सिध्द क्षेत्र कुंथलगिरी असा प्रवास केला.

जैन टॅग ग्रुपच्या अध्यक्षा श्वेता कासलीवाल यांनी शुक्रवार, 28 नोव्हेंबर रोजी शहानुरमियॉ दर्गा येथून सायकल यात्रेला सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी 125 किलामीटर लांबीचा प्रवास करुन बीड येथे मुक्काम केला. त्यानंतर त्यांनी शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी सायकलवरुन 60 किलोमीटर लांबीचा प्रवास करुन कुंथलगिरी येथे जावून भगवंताचे पूजन केले. यावेळी त्यांच्यासोबत राजेश कासलीवाल, रौनक ठोले, सचिन कासलीवाल, विजय पाटोदी, संकेत पहाडे यांनी सुध्दा छत्रपती संभाजीनगर ते कुंथलगिरी पर्यत साकल यात्रा पूर्ण केली. जैन टॅग ग्रुपच्या अध्यक्षा श्वेता कासलीवाल यांनी केलेल्या या सायकल यात्रेचे जैन समाजात कौतुक करण्यात येत असल्याची माहिती नरेद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी दिली.