धावडा : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी फाटा येथे पारध पोलिसांनी रविवार, 30 नोव्हेंबर रोजी पहाटे गोवंश जातीच्या मासाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडत मोठी कारवाई केली. या कारवाईत अंदाजे 2 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तोफीक खलील कुरेशी (32), रा. शिवना, ता. सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, शेख आझम शेख कादर (42), रा. मोताळा, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा असे या कारवाईत अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत. अजिंठा ते बुलढाणा मार्गावर रविवारी पहाटे पारध पोलीस पेट्रोलिंक करीत होते. वालसावंगी फाट्याजवळ पोलिसांना मारुती सुझुकी अल्टो कार व या कारमध्ये बसलेल्या दोघांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलीसांनी ही कार थांबवून तपासणी केली असता अल्टो कारमध्ये विनापरवाना गोवंश जातीचे मास वाहतूक होत असल्याचे दिसून आले. पोलीसांनी कारसह दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत 60 हजार रूपये किंमतीचे अंदाजे 120 किलो गोवंश जातीचे मास, 1 लाख 80 हजार रुपये किंमतीची अल्टो कार असा एकूण 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस शिपाई संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपी तोफीक कुरेशी व शेख आझम या दोघांना अटक केली.