बुलढाणा : बुलढाण्यातील प्रत्येक घराची मोजणी करून लँड रेकॉर्ड म्हणजे जमिनीच्या नोंदी, ज्यात जमिनीची मालकी, क्षेत्रफळ, पाण्याचा दर आणि इतर महत्त्वपूर्ण तपशील समाविष्ट असणार आहे. लँड रेकॉर्डची मोजणी करून देण्याची जबाबदारी भूमी अभिलेखची आहे. ती महसूल खाते चांगल्या प्रकारे पार पाडेल. त्यांची सरकारी नोंदणी झाली पाहिजे. बुलढाण्यातील सर्व भुखंडांना प्रॉपर्टी कार्ड देणार, असे आश्वासन महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ते बुलढाणा येथे रविवारी नगर पालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्पिता विजयराज शिंदे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. सोबतच दोन हजार घरं बुलढाण्याला देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बावनकुळे यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. काँग्रेसचा पंजा भकासाचा पंजा आहे. पाच हजार कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली. काँग्रेसमध्ये राम राहिला नाही, विसंवाद आहे. नाना पटोले वडेट्टीवारीचे तोंड पाहत नाहीत किंवा वडेट्टीवार नाना पटोलेंना भेटत नाहीत, असे म्हणून काँग्रेसवरही बानवकुळे यांनी निशाना साधला. बुलढाण्यातील भ्रष्टाचार, बदमाशीचा उल्लेख करत विकसीत बुलढाण्याचा संकल्प बावनकुळे यांनी व्यक्त केला.