शहरीकरणाला अभिशाप समजू नका, शहरातूनच रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन 

बुलढाणा : केंद्र सरकारने शहराकडे आणि नागरिकत्वाकडे सर्वात पहिले लक्ष्य दिले. महाराष्ट्रातील ५० टक्के भाग त्यातही 6.6 कोटी जनता चिखली सारख्या ४०० शहरांमध्ये राहते. त्यामुळे, शहरांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,  शहरीकरणाला अभिशाप समजू नका, शहरातूनच रोजगार निर्मिती असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

   सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवार, २५ नोव्हेंबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भ दौऱ्यावर असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी चिखली येथील जाहीर सभेला संबोधित केले.  चिखली शहराचे ग्रामदैवत आई रेणुका मातेचे आशीर्वाद घेतो’ असे म्हणत  मुख्यमंत्री फडणवीस यांनी  भाषणाला सुरुवात केली. मी इथे, कुणावर टिक्का टिप्पणी करण्यासाठी आलो नाही, केवळ विकासावर बोलण्यासाठी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासात्मक धोरणांवर त्यांनी प्रकाश टाकला. केंद्र सरकारने सुरुवातीपासूनच शहरांच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले आहे. विशेषतः केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेमुळे शहरीभागाला समृद्ध करण्यासाठी चालना मिळाली, केंद्र सरकार, राज्य सरकार, आमदार आणि नगरपालिका मिळाल्यास शहराचा  विकास वेगाने होईल, असेही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.

नगराध्यक्षाला काढून टाकण्याचे धैर्य भाजपमध्ये’

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,  भारतीय जनता पक्ष  भ्रष्टाचाराला कधीही स्थान देत नाही. स्वतःच्या नगराध्यक्षाने चुकी केली तरी त्याला काढून टाकण्याचे धैर्य भाजपमध्येच आहे.  चिखली शहरात उभारला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा चिखलीकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब ठरेल, असेही त्यांनी सांगितले.  त्याच पार्श्वभूमीवर घटनेचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »