अपहरण प्रकरण; इंदौर आणि  पुण्यातून पीडितांची सुटका: डोणगाव आणि तामगाव हद्दीतील गुन्ह्याची उकल 

बुलढाणा :  डोणगाव आणि तामगांव पोलीस स्टेशन हद्दीतून अपहरण झालेल्या दोन पीडितांची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  केली. सण 2022 आणि 2024 मध्ये जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावर असलेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने तपास करण्याचे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी आदेशित केले होते. त्यानुसार, अपहरण झालेल्या  पिडीत बलिकांची   इंदौर आणि  पुण्यातून सुटका करण्यात आली. या दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

  पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि  मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अपहरण प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तसेच पीडितांची सुटका करण्यासाठी पथक नेमण्यात आले होते. दरम्यान, डोणगाव पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या गुन्ह्या संदर्भात तपास केला असता एका बालिकेला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणातील आरोपी विशाल उर्फ तुषार राजू अंभोरे (रा. घाटबोरी) हा पुणे जिल्ह्यातील चाकण येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती वरून पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी 14 नोव्हेंबर रोजी धाड टाकून आरोपीस अटक करत पीडितेची सुटका केली. 

तीन वर्षापूर्वीच्या गुन्ह्याची उकल 

सण 2022 मध्ये तामगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्या संदर्भात तपासचक्रे फिरवली असता अपहरण झालेली पीडिता आणि आरोपी हे मध्यप्रदेशातील  इंदौर येथील प्रीतनगर येथे असल्याचे समोर आले. याप्रकरणातील संदिग्ध आरोपीचे नाव विक्की प्रकाश गव्हांदे (26वर्ष, रा. वकाना, ता. संग्रामपूर)असे असल्याचे निष्पन्न झाले.  पुढील चौकशीसाठी आरोपीस तामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पिडीत बालिकेची 11 नोव्हेंबरला सुटका करण्यात आली आहे.   

 कारवाई पथक.. 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे,  अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील अंबुलकर, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक  संजय ठाकरे, पोहेकॉ संभाजी असोलकर, पोहेकॉ सना खेडेकर, चालक पोकॉ सचिन शेंद्रे,   पोहेकॉ राजु आडवे, पोकॉ कैलास ठोंबरे (तांत्रिक विश्लेषण विभाग) यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »