भोकरदन : शहर बसस्थानक परिसरात मंगळवारी केवळ लघुशंका केल्याच्या कारणावरून येथील बसस्थानक गार्डने एकाला अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच संतप्त शेकडो नातेवाईक आणि नागरिकांचा जमाव पोलीस स्टेशनसमोर एकत्र आला, त्यामुळे काहीवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील दोन आठवड्यातील ही दुसरी खूनाची घटना आहे.

मजित खान अन्वर खान पठाण (60), रा. कटोरा बाजार, ता.भोकरदन असे खून झालेल्या प्रवाशाचे नाव आहेत.
पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, भोकरदन बसस्थानकामध्ये सुरेश गणपत वनारसे रा. फत्तेपूर हा काही महिन्यांपासून कंत्राटी पदावर सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत होता. दरम्यान मंगळवार, 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मजित खान हे कटोरा बाजार येथून बँकेच्या खाजगी कामा करिता भोकरदनला आले होते. आपले काम आटोपून ते बसस्थानक परिसरात गेले. येथील सुरक्षा रक्षक वनारसे याने, तुम्ही या परिसरात उघड्यावर लघुशंका का करता, असे म्हणून प्रवासी मजित यांना अपमानास्पद बोलत शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर मजित खान यांना सुरक्षा रक्षक वनारसे याने जवळ असलेल्या काठीने बेदम मारहाण करत बसस्थानकाच्या बाहेर काढले. यात खान यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिगाड झाल्याने त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविले असता, त्यांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत हे करीत आहे.