पाचपीरवाडी : गंगापूर तालुक्यातील डोणगाव मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे अतिवृष्टी २०२४ व २०२५ अनुदान तसेच २०२५ सालचा पीक विमा दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. परंतु पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करुन शासनाचा निषेध केला होता. त्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचे पैसे न आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दिवशी पिंपळगाव येथील क्रांतीचौकात सोमवार, 3 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

गंगापूर तालुक्यातील डोणगाव मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे अतिवृष्टी २०२४ व २०२५ अनुदान तसेच २०२५ सालचा पीक विमा दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. दिवाळी संपून आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपयाची मदत न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समितीच्या वतीने डोणगाव मंडळातील शेतकऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणात पाचपिरवाडी, वरझडी, दिवशी पिंपळगाव, किन्हळ, रायपूर, देऱ्हळ, सनव, दिनवाडा येथील शेतकरी सहभागी झाले आहेत.
यावेळी शेतकरी कृती समितीच्या वतीने मंडळ अधिकारी काशाबाई घुगे, पिंपळगावचे तलाठी डी.टी. गायके, रायपुरचे तलाठी सुरेश ठेंगडे, कृषी सहाय्यक भागडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार शेतकरी कृती समितीने आणि उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी केला आहे.