लासुर स्टेशन : गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील गीताबन या ठिकाणावरून काही दिवसापूर्वी पिकअप वाहनाद्वारे पाच चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची स्टील चोरून पोबारा केला होता. शिल्लेगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली.

लासुर स्टेशन येथील गीताबन येथून डॉ. निलेश हरिकिसन मुंदडा व व्यापारी किशोर कोठारी यांच्या पिकअप वाहनासह अडीच लाख रुपयांचे स्टील व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून अडीच लाख रुपयांचे स्टील, अनुक्रमे 20 ऑक्टोबर व 29 ऑक्टोबर रोजी स्टील चोरट्यानी चोरून नेल्याची तक्रार शिल्लेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिस या घटनेचा तपास करीत होते.