छत्रपती संभाजीनगर : राजाबाजार येथील जैन मंदिरात भगवान महावीर निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जैन पंचायतचे अध्यक्ष महावीर पाटणी यांनी दिली आहे. आचार्य प्रणामसागर महाराज यांच्या सानिध्यात लाडू चढविला जाणार आहे.

राजाबाजार येथीज जैन मंदिरात भगवान महावीर निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी भगवंताचा पंचामृत अभिषेक, पुजा, आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर जैन पंचायतचे सचिव प्रकाश अजमेरा यांच्या हस्ते निर्वाण लाडू चढविण्यात येणार आहे. तसेच पंचायतचे अध्यक्ष महावीर पाटणी यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणर करण्यात येणार आहे. तसेच शिखर मंदिरावर चातुर्मास अध्यक्ष ॲड. अनिल कासलीवाल यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात येणार आहे. बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवानिमित्त भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात येणार आहे. तर सायंकाळी जैन मंदिरात पाडवा मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भगवान महावीर निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमास समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन जैन पंचायतचे अध्यक्ष महावीर पाटणी, सचिव प्रकाश अजमेरा, चातुर्मास अध्यक्ष अनिल कासलीवाल, महामंत्री प्रमोद पांडे, संजय पहाडे, नरेंद्र अजमेरा, पियुष कासलीवाल आदींनी केले आहे.