मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान वेतन दरानुसार वाढ; राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या प्रयत्नांना यश

छत्रपती संभाजीनगर :  महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान वेतन दरानुसार वाढ करण्याचा निर्णय मनपा आयुकत जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. मनपा आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदाने साजरी होणार असल्याचे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत अडीच हजार कंत्राटी कर्मचारी काम करीत असून गेल्या सहा वर्षापासून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किमान दराने पगार मिळावा यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने लढा देण्यात येत होता. त्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीने कामगार न्यायालयातही धाव घेतली होती. आयुक्त जी. श्रीकांत यांनी मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 13 हजार रुपयांऐवजी 23 हजार रुपये वेतन देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरु केली आहे. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत आनंदाची बातमी मिळाल्याने त्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.

दरम्यान, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांचा मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संदिपान काचे, सिध्दार्थ ढाले, भरत कुलकर्णी, अनिल मोमय्या, प्रशांत जाधव, फकिरा खरात, शिला जाधव, रुबीना कुरेशी, अरिफ खान, अब्रार खान, अनिल बिडकर, राजरत्न महापुरे, दिपक गाडेकर, प्रवीण म्हस्के, निलेश भांगे, राजू खरात, रवींद्र झोंबाडे, फिरोज खान, तुकाराम पवार, सुभाष काने, बाबासाहेब ताटे, संदिप आदमने, सुमित आदमने बाळू चव्हाण, सुमित गव्हाळे, स्वप्नील अवताडे, बाबासाहेब रोडे, राजू खरात, शुभम राजपूत, नितीन नवटक्के, अजय साठे, यमुना कापसे, आदित्य बोडके, कविता शेजवळ आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »