शेगाव : येथील सामाजिक, राजकीय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले माऊली शैक्षणिक ग्रुपचे संस्थाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. शिक्षक भारती संघटनेचे विभागीय अध्यक्ष तथा राज्य संघटक, अदिती अर्बनचे संस्थापक सुरेश देवकर यांनी पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन हा सत्कार केला

याप्रसंगी सत्कारमूर्ती पाटील आणि सुरेश देवकर यांची शैक्षणिक विषयावर चर्चा झाली. शिक्षकांसाठी, शिक्षक भारती ही संघटना अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे सांगत आपले सातत्यपूर्ण सहकार्य राहील अशी भावना ज्ञानेश्वर पाटील यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक खोरखेडे, अदिती अर्बनचे संचालक सुशील पनाड, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष नितीन वाढे, सुरेश लांबे, नीलकंठ धुमाळे, विलास मसने, संतोष भालतडक, श्रीकृष्ण असंबेर, अविनाश बाठे, राहुल गव्हांदे, रमेश पवार, मदन जाधव, भारत मोरे, गणेश भटकर, कुलदीप लोखंडे यांसह अनेकांची उपस्थिती होती.