जालना : जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. सोमवार, १३ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे ५७ गट आणि पंचायत समितीच्या ११४ गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे कोणते गट आणि पंचायत समितीचे कोणते गण आरक्षित होणार याकडे लक्ष लागले आहे.

जालना जिल्ह्यातील ५७ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या ११४ गणातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येसह वाढत्या क्रमानुसार कोणते जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होऊ शकतात याबाबतचा प्रस्ताव जालना जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे दोन दिवसांपूर्वीच सादर केला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या आठ गटांमध्ये कोणते चार गट महिलांसाठी राखीव होतात आणि कोणते पुरुषांसाठी राखीव होतात हे येत्या सोमवारी आरक्षण सोडतीच्या वेळी स्पष्ट होणार आहे.
अनुसूचित जातींसाठी आठ गट आरक्षित ?
जिल्ह्यातील ५७ जिल्हा परिषद गटांपैकी जालना तालुक्यातील तीन, बदनापूर व जाफराबाद तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि भोकरदन तालुक्यातील एक असे आठ गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या आरक्षित होणाऱ्या संभाव्य आठ गटांमध्ये जालना तालुक्यातील वाघ्रूळ जहागीर, सेवली, रेवगाव बदनापूर तालुक्यातील सेलगाव,बावणे पांगरी,जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग,सिपोरा अंभोरा आणि भोकरदन तालुक्यातील राजूर या गटांचा समावेश असण्याची शक्यता आहे.