संग्रामपूर : तालुक्यातील बावनबीर गावामध्ये नवदुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक करून विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रकार समोर आला आहे. या अचानक झालेल्या प्रकारात पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलीस विभागाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून दगडफेक करणाऱ्या 50 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

संग्रामपूर तालुक्यातील बावणबीर गावामध्ये 4 ऑक्टोबर रोजी नवदुर्गा देवी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये एकूण सात मंडळांनी सहभाग घेतला होता. रात्री बावनबीर गावातील मार्केट रोड पाण्याच्या टाकी जवळून मिरवणूक पुढे जात असताना अचानक विसर्जन मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी तुफान दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या दगडफेकीमध्ये मंडळातील काही पदाधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच संग्रामपूर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्तिथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी दक्षतेने हालचाली केल्या असून सध्या गावात पूर्ण शांतता प्रस्थापित झाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या घटनेनंतर बावनबीर परिसरात तणावाचे वातावरण कायम असले तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.