ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची मागणी 

जालना :  मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे केली. 

जालना :  मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे केली. 

   माजी खा. राजू शेट्टी यांनी शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी  अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव, नाथवस्ती, विज्ञानेश्वर आपेगाव या गोदावरी नदीच्या महापुराने बाधित गावांना भेटी देऊन अतिवृष्टी बाधित खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी द्यावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठे आंदोलन उभारणार असल्याचेही  ते म्हणाले.

     यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, सचिव पांडुरंग गटकळ, विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र खटके, आपेगावचे सरपंच पांडुरंग चौधरी, सुदाम जाधव, अंगद काळे, युवा तालुकाध्यक्ष उमेश पाष्टे, तालुका सचिव भारत उंडे, युवा नेते अभिजित काळे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव खोसे, ज्येष्ठ नेते तुकाराम गवळी, हभप गणेश बोचरे, परतूर तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे, धाकलगाव सर्कल प्रमुख विकास काकडे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »