नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाले; प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध सुरू : नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील घटना

नांदुरा : तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीमध्ये पोहोचण्यासाठी गेलेले दोन्ही तरुण बेपत्ता झाल्याची घटना 28 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजे दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. युवकांच्या शोधासाठी एनडीआरएफचे पथक युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.

नांदुरा : तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीमध्ये पोहोचण्यासाठी गेलेले दोन्ही तरुण बेपत्ता झाल्याची घटना 28 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजे दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. युवकांच्या शोधासाठी एनडीआरएफचे पथक युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.

        सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठीक ठिकाणी नदी नाल्यांना पूर परिस्थितीचे स्वरूप आले आहे. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील करण गजेंद्र भोंबळे (19) व वैभव ज्ञानेश्वर फुके (23) हे दोघे निमगाव मधील ज्ञानगंगा नदीमध्ये दुपारी एक वाजे दरम्यान पोहण्यासाठी गेले होते. मात्र नदीचा जल्लस्तर वाढलेला असल्यामुळे तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यामध्ये बुडाले. याबाबत परिसरातील नागरिकांना सदर प्रकार लक्षात येतात त्यांनी आरडा ओरड करून बुडालेल्या युवकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही पाण्यामध्ये बेपत्ता झाले होते. या घटनेची माहिती गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. तातडीने गावकऱ्यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचवून तातडीने याबाबत नांदुरा तहसीलदार आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच तहसीलदार आणि बचाव कार्य पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तहसीलदारांनी एनडीआरएफ पथकाला मलकापूर येथून निमगाव येथे पाचरण केले. सदर पथकाकडून बेपत्ता झालेल्या दोन्ही युवकांचा युद्ध पातळीवर शोध घेतल्या जात आहे. परंतु उशिरापर्यंत दोघांचाही शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी नदीपात्राजवळ गर्दी केली होती. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. उशिरापर्यंत बचाव पथकाचे शोध कार्य सुरू होते.

 मुसळधार पावसामुळे शोध कार्याला अडथळा 

 दरम्यान दुपारी निमगाव येथील ज्ञानगंगा नदीपात्राच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने बचाव पथकाला बेपत्ता युवकांचा शोध घेण्यासाठी मोठ्या अडचणी व अडथळे निर्माण होत आहे. मुसळधार पावसामुळे पथकाला काही काळ शोधकार्य थांबवावे लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »