खामगावात जबरी चोरीचा प्रयत्न ; चोरांशी हातापायीमध्ये अग्रवाल पिता पुत्र गंभीर जखमी 

खामगाव : शहरापासून जवळच असलेल्या वाडी येथील साईनगर जवळील रेल्वे लाईन जवळ पहाटे तीन वाजे दरम्यान भुरट्या चोरांनी एका घरात चोरीचा प्रयत्न केला असता चोरांची झालेल्या हातापायी मध्ये पिता-पुत्र गंभीर स्वरूपाने जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भुरट्या चोरांची दहशत निर्माण झाली आहे.

         शहरापासून जवळच असलेल्या वाडी गावामध्ये भुरट्या चोरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट दिसून येत असून ही बोलती चोरटे मध्यरात्रीचे दरम्यान वाढीव परिसरात मोकाटपणे फिरून छोटे-मोठे दुकाने आणि घरे लक्ष करताना दिसून येत आहे. दरम्यान वाडी भागातील साईनगर येथील रेल्वे लाईन जवळ असलेल्या अग्रवाल यांच्या घरी पहाटे तीन वाजे दरम्यान ही पोरगी चोरटे घराचा कडे कोंडा तोडून शिरले. परंतु अग्रवाल यांना आवाज येतच त्यांनी व त्यांच्या मुलाने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु चोरगे चार ते पाच जण असल्याने त्यांनी अग्रवाल पिता पुत्रांवर चाकूने हल्ला केला व त्यांना गंभीर स्वरूपाने जखमी करून तेथून पळ काढाला. या घटनेमुळे परिसरात एकच दहशत पसरली असून घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तसेच श्वानपथकाला प्रचारण करून युद्ध पातळीवर चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले असून पोलिसांनी सदर चोरट्यांची ओळख पटविण्याचे आवाहन सुद्धा परिसरातील नागरिकांना केले आहे. दरम्यान जखमी अग्रवाल पिता पुत्रांना तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघे गंभीर जखमी असल्याचे बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »