कन्नड : शिवना नदीच्या काठावर असलेल्या लंगोटी महादेव मंदिराला पूराच्या पाण्याने वेढा दिल्याने मंदिरातील पुजारी आणि त्यांचे कुटुंबिय अडकले होते. संकटाच्या वेळी शेजारी राहणाऱ्या मुस्लिम समाजातील काही युवकांनी जात, धर्म, पंथ न पाहता मदतीस धाव घेत पुजारी व त्यांच्या कुटुबियांना पूराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले. मुस्लिम समाजातील युवकांनी दाखविलेल्या या धाडसामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण समाजासमोर आले आहे.

कन्नड शहरातील शिवनगर भागातून वाहणाऱ्या शिवना नदीच्या दुसऱ्या कठावरील एका शेतात लंगोटी महादेव मंदिर आहे. मंदिरात दिलीप गिरी हे पुजारी असून त्यांच्यासह त्यांची दोन भावंडाचे कुटुंबही मंदिरात वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने मंदिर परिसराला पाण्याचा वेढा पडला होता. त्यात सहा जण अडकले होते. मंदिराच्या पुजाऱ्यासह त्यांचे कुटुंबिय पुराच्या पाण्यात अडकले असल्याचे लक्षात आल्यावर फैजल हसन पठाण, सलमान पठाण, अझर पठाण, फैयाज पठाण, सोनू लाल पठाण, विलास बाबुराव जाधव, अय्याज हसन पठाण, व अनिस सलीम पठाण या तरुणांनी धाडस दाखवत पाण्यात उतरले. त्यांनी पुजारी व त्यांच्या कुटुंबाला स्वतःच्या खांद्यावर उचलून सुरक्षित स्थळी पोहोचवले. गावातील मुस्लिम तरुणांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.