अंढेरा : कर्जापायी एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार 26 सप्टेंबरच्या दुपारी गुंजाळा येथे घडली. संतोष शंकर केदार वय 21 असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

अंढेरा : कर्जापायी एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार 26 सप्टेंबरच्या दुपारी गुंजाळा येथे घडली. संतोष शंकर केदार वय 21 असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील वर्षी अपुऱ्या पावसामुळे पिकांची नासाडी झाली होती, उतारा कमी आला होता. यावर्षी चांगल्या पावसाने पीक बहरात आले असतानाच दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अति पावसामुळे शेतकऱ्याच्या आशांवर पाणी फेरले. त्यातच बँक कर्जाचे दडपण सहन न झाल्याने संतोषने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या गाव परिसरातील शेत शिवारात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार संतोषचा चुलत भाऊ गणेश शंकर केदार यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.