नवी दिल्ली : शाहरुख खान, विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी आणि मोहनलाल सारख्या अनेक अभिनेत्यांना ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटातील सर्वोत्तम कलाकारांना त्यांच्या अमूल्य योगदानासाठी राष्ट्रीय चित्रपट २०२३ पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. प्रसिद्ध साऊथ अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चित्रपटातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. चार दशकांहून अधिक काळ आणि ३४० हून अधिक चित्रपटांमध्ये मोहनलाल यांनी काम केले आहे. मल्याळमपासून तमिळ, तेलुगु, कन्नड अशा भाषांतील चित्रपटांत काम केले आहे. सुपरस्टार मोहनलाल लवकरच त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘वृषभा’ मध्ये दिसणार आहेत. या वर्षीचे पुरस्कार बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी विशेष क्षण आहेत.
असे मिळाले पुरस्कार…
विक्रांत मेस्सी- १२ वी फेल-सर्वोत्कृष्ट अभिनेता
शाहरुख खान-जवान-सर्वोत्कृष्ट अभिनेता
राणी मुखर्जी-सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे)
मेघना गुलजार (दिग्दर्शिका)-सॅम बहाद्दूर
करण जोहर (दिग्दर्शक)-रॉकी और रानी की प्रेम कहाणी
अविनाश बेंडे- आत्मपॅम्फ्लेट
विधू विनोद चोप्रा (दिग्दर्शक)- १२ वी फेल
बालकलाकार – भार्गव सुनीता जगताप (मराठी चित्रपट नाळ)
श्रीनिवास पोकळे – नाळ -२ (मराठी चित्रपट)
त्रिशा विविक ठोसर – नाळ -२
कबीर खंडारे – जिप्सी (मराठी चित्रपट)