तुळजापूर येथून आणलेल्या ‘ज्योत’ चे सावळदबारा येथे स्वागत; 400 किलोमिटर पायी चालले युवक

सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील युवकांनी तुळजापूर येथून पायी चालत ज्योत आणली. तुळजापूर येथून ज्योत घेवून निघालेल्या तरुणांचे सोमवार, 22 सप्टेंबर रोजी सावळदबारा येथे आगमण झाल्यावर त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

नवरात्र उत्सवानिमित्त सावळदबारा येथील जयभवानी नवयुवक मंडळाच्या युवकांनी तुळजापुराच्या देवीच्या मंदिरातून तब्बल 400 किलोमिटर अंतर पायी चालून ज्योत गावात आणली. ज्योत घेवून आलेल्या युवकांचे आगमण होताच सावळदबारा येथील ग्रामस्थांनी त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते, गणेश नरोटे, ज्ञानेश्वर वरखड, सागर कुल्ली, निवृत्ती खडके, जीवन कुल्ली, आदेश पाटील, दिपक गलबले, प्रतिक देशमुख, यश टिकारे, नामदेव जाधव, ज्ञानेश्वर सोनवणे, यश पाटील, मंगेश टिकारे, चेतन इंगळे, प्रकाश देशमुख, मयूर सपाटे, पंकज टिकारे, यश पधाडे, शंकर खराटे, संदिप कोलते, गोपाल सपाटे, पवन कुल्ली, विशाल खडके, तुकाराम खिरडकर आदींसह सावळदबारा येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »