मनोज जरांगे यांच्या बैठकीत मधपाशांचा हल्ला; समन्वयक, कार्यकर्त्यांची पळापळ

जालना : जिल्ह्यतील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत रविवारी दुपारच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. मराठवाड्यातील समन्वयकांची बैठक सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. या अनपेक्षित घटनेमुळे बैठकीत व्यत्यय आला, अनेक कार्यकर्त्यांना मधमाशांच्या हल्ल्यात सापडले. यावेळी समन्वयकांनी मनोज जरांगें यांना सुरक्षित स्थळी नेले.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवार, 21 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटीत मराठा समन्वयकांची बैठक बोलावली होती. या बैठकीची तयारी सुरू असताना आणि चर्चा सुरू होण्याच्या काही वेळातच अचानक या ठिकाणी मधमाशांचे मोहोळ आले. या मधमाशांनी थेट उपस्थितांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक समन्वयक आणि कार्यकर्त्यांना मधमाशांनी चावे घेतल्याने बैठकस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, समन्वयकांनी तात्काळ मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर इजा होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यातील उपरणे काढून त्यांना झाकले व तात्काळ सुरक्षित ठिकाणी नेले. या गोंधळात पोलिसांचीही धावपळ उडाली. मधमाशांच्या या हल्ल्यामुळे बैठकीत काही वेळासाठी व्यत्यय आला. मात्र नंतर ही बैठक पार पडली.

आरक्षणाला ‍विरोध नाही

यावेळी मनोज जरांगे यांनी मधमाशांच्या हल्ल्यापूर्वी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, आम्ही कुणाच्याही आरक्षणाला विरोध करत नाही. सर्वांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करायला हवे व इतर अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले. मराठा सेवकांची आणि मराठा समाजाला मदत करणाऱ्यांची ही बैठक असून आजच्या बैठकीसाठी अभ्यासक नाही, तर मराठा तालुका सेवक आणि मराठवाड्यातील प्रमुखांना बोलवले असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »