बुलढाणा : दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी मलकापुर शहरात घडली होती. या प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव जिल्ह्यातून अटक केली असून, त्यांच्याकडून दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे.

जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. यावरून, पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी पथक स्थपित केले. दरम्यान, मलकापुर पोलिसांत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास केला असता पळून जाण्याच्या तयारीत असलेले दोन जणांना जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथून अटक करण्यात आली. अब्बास ईबादत शेख (२३ वर्ष, रा. भुसावळ), साहिल हुसैन मोहम्मद इज्जत अली जाफरी (२१ वर्ष, रा. कर्नाटक) असे आरोपींची नावे असून, त्यांनी मलकापुर व नाशिक येथे चोरी केल्याची कबुली दिली.
एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
आरोपीकडून एक बजाज कंपनीची दुचाकी (किंमत एक लाख रुपये) पोलिसांनी हस्तगत केली आहे.