बुलढाणा : शेतकऱ्याला विश्वासात न घेता बुलढाणा नगर परिषदेकडून येळगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रात सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या निषेधार्थ येळगाव येथील शेतकरी राजू भिमराव काकडे यांनी शहरातील कोर्ट चौक परिसरातील बीएसएनएलच्या उंच टॉवरवर चढत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. ही घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू काकडे यांची दोन एकर शेती येळगाव धरणाच्या भिंतीखालील बुडीत क्षेत्रात आहे. या जमीनीवर नगरपालिकेकडून सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय थेट काम हाती घेतल्यामुळे काकडे संतप्त झाले. शेवटी या निषेधार्थ त्यांनी टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला.टॉवरवर चढल्याचे त्यांनी स्वतःच आपल्या गावकऱ्यांना मोबाईलवरून कळवले. त्यानंतर त्यांनी मोबाईल बंद केल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. अवघ्या काही मिनिटांत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.