गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

वाशिम : शहरातील गणेश भक्तांसाठी आजचा दिवस उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला ठरला. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी धार्मिकतेच्या साक्षीने आणि ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात सुरुवात झाली. 

खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते मानाच्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्याचे उदघाटन

वाशिम : शहरातील गणेश भक्तांसाठी आजचा दिवस उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला ठरला. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी धार्मिकतेच्या साक्षीने आणि ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात सुरुवात झाली. 

शहराच्या मध्यवर्ती भागात पारंपरिक थाटामाटात, ‘शिवशंकर गणेश मंडळा’च्या मानाच्या गणपतीचे पूजन आणि विसर्जन सोहळ्याचे उद्घाटन खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.खासदार संजय देशमुख यांच्यासोबत आमदार किरणराव सरनाईक, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, माजी आमदार विजयराव जाधव, नगराध्यक्ष अशोक हेडा, जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मनराव इंगोले, शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, डॉ. सिद्धार्थ देवळे, डॉ. सुधीर कव्हर, प्रा. दिलीप जोशी, प्रा. संगीताताई इंगोले, डॉ. कविता खराट, राजू पाटील राजे, मो. मुस्तफा मो. मतीन, अखिलभाई तेली, राजू रंगभाळ, कॉ. प्रशांत सुर्वे, गजानन वडजिकर, गजानन भांदुर्गे, जुगलकिशोर कोठारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीच्या प्रारंभी खासदार देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले आणि त्यानंतर विधिवत श्री गणेशाचे पूजन करत मिरवणुकीचा शुभारंभ केला. या वेळी वातावरण भक्तिमय आणि ऊर्जा देणारे होते. बॅण्ड, ढोल-ताशा, गणेश मंडळांचे स्वयंसेवक आणि गणेशभक्त यांचा मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग होता. रस्त्यावर ठिकठिकाणी सजावट, आकर्षक देखावे आणि प्रसाद वाटप यामुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

पोलीस प्रशासनाने संपूर्ण मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि नागरिकांच्या सोयीसाठी यंत्रणांनी प्रभावी नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »