ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींची खरेदी; वाशिमच्या विठ्ठलवाडीत भक्तांची तुफान गर्दी

वाशिम  : गणेशभक्तांना आतुरता लागून असलेल्या गणेशोत्सवाचा शुभारंभ आजपासून झाला असून, घराघरात व सार्वजनिक मंडळात गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात भाविकांनी गणेशमूर्तीची खरेदी केली आणि विठ्ठलवाडी परिसर क्षणाक्षणाला उत्साहाने दणाणून गेला.

सकाळच्या सुमारास विठ्ठलवाडी परिसरात गणेशमूर्ती विक्रीची दुकाने फुलून उठली होती. रस्त्याच्या दुतर्फा मांडलेल्या छोट्या-छोट्या दुकानांवर भक्तांची रिमझिम पावसातही ओसंडून वाहणारी गर्दी होती. आकाशात ढगाळ वातावरण असल्याने भक्तांनी पहाटेपासूनच मूर्ती खरेदीसाठी धाव घेतली. घराघरात गणपती बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात घरगुती मूर्तीची खरेदी होत असल्याचे चित्र दिसून आले.  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या उत्सवासाठी आधीच मूर्तींची बुकिंग केली होती. काही मंडळांनी मात्र आजच्या मुहूर्तावर मूर्ती खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या आकाराच्या भव्य मूर्ती गाड्यांवरून ढोल-ताशांच्या निनादात नेण्यात आल्या. प्रत्येक मंडळाच्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

विठ्ठलवाडी परिसरात पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या वाहनांची व दुचाकींची गर्दी टाळण्यासाठी दुकान परिसरात वाहतूक बंदी लागू केली होती, त्यामुळे वाहतूक कोंडी टाळता आली. भक्तांनीही शिस्तबद्ध पद्धतीने मूर्ती खरेदीसाठी रांगा लावल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »